नेवासा – मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात अनुदान ७५ हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे केले, आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ.
चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि अन्य नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजितदादा म्हणाले, राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत आहे. हे पाहता १ लाख रुपयांपर्यंत अनुदान कसे वाढविता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यात येईल.
बियाणे, कीटकनाशकांसंदर्भातील तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नये, यासाठी कठोर कारवाई करावी. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटीमार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचनाही अजितदादांनी यावेळी केल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.