नेवासा – दिग्गज ओबीसीं नेते छगन भुजबळ आज मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पक्षांतर्गत वाद आणि राजकीय समीकरणे यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे भुजबळ नाराज होते. ही नाराजी त्यांनी अनेकदा बोलूनही दाखविली होती. तसेच ओबीसी समाजही नाराज झाला होता.

आता ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्त्न करण्यात येत आहे. त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. धनजंय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं होतं. तेच खाते आता भुजबळांकडे सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.