ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शौर्य यात्रा

नेवासा – नेवासा शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला “भारत माता की जय”वंदे मातरम च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. श्री मळगंगा देवी पासून ढोल ताशांच्या गजरात तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. भारत माता की जय,वंदे मातरम चा जयघोष करत वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल पथक तसेच भारत माता,अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांची बालगोपाळांनी केलेली वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीत हातात तिरंगा झेंडे घेऊनमहिला,युवती,युवक,नागरिक सहभागी झाले होते.

शौर्य यात्रा

यावेळी तलवारबाजी,शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. नेवासकरांच्या वतीने तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीचे तोफांची सलामी देत नेवासा शहरातील चौकाचौकात स्वागत करण्यात आले. सदर रॅलीच्या समारोप प्रसंगी पेहलगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पारंपारिक सौदामिनी च्या पथकातील वादयांनी नेवासा शहर परिसर दुमदुमला होता. तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूक प्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ अमृता नळकांडे,नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप राजे चिंधे पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते,श्रीकांत नळकांडे, कृपाताई श्रोत्रीय, साधनाताई मुळे,प्रशांत बहिरट,आदिनाथ पटारे ,ऋषिकेश श्रोत्रीय,शाम मापारी यांच्यासह नेवासकर नागरिक महिला युवती युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौर्य यात्रा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शौर्य यात्रा
शौर्य यात्रा
शौर्य यात्रा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शौर्य यात्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *