ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मोटे

वडाळा बहिरोबा – ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे नियमाप्रमाणे त्वरित निष्कासित न केल्यास येत्या ५ जून पासून वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा संदीप मोटे यांनी दिला आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनास दिलेल्या निवेदनात मोटे यांनी म्हटले आहे की, वडाळा बहीरोबा ग्रामपंचायत हद्दीतील एका कुटुंबाने नियमाप्रमाणे कुठल्याही शासकीय यंत्रणेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे निवासी तसेच व्यावसायिक बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे.

मोटे

या कुटुंबाने धारण केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक बांधकामे करून ग्रामपंचायतीच्या गटारे, रस्त्यांना अडथळा निर्माण केल्याचा आरोप मोटे यांनी निवेदनात केला आहे. या कुटुंबाने अतिक्रमणांद्वारे केलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे लगतच्या निवासी तसेच व्यावसायिक ग्रामस्थांना धोका निर्माण झाल्याकडे मोटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाचा अंकुश नसल्याने अशा प्रकारे गावात विनापरवानगी अतिक्रमित बांधकामांची संख्या वाढल्याचे मोटे यांनी निवेदनात नमूद करून या अतिक्रमणांमुळे गावातील रस्ते, गटारी आदी विकास कामांना अडथळा निर्माण झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे वडाळा बाहिरोबा ग्रामपंचायत प्रशासनाने येत्या आठ दिवसांत संबंधित कुटुंबाच्या अतिक्रमणांसह गावातील इतर सर्व अतिक्रमणे नियमानुसार तातडीने निष्कासित करण्याची कार्यवाही न केल्यास येत्या दि.५ जून २०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मोटे यांनी दिला आहे.

मोटे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोटे
मोटे
मोटे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *