ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गोमांस

नेवासा – आज दिनांक. 30/05/2025 रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे सलबतपुर ता. नेवासा येथील कुरेशी मोहल्यात गोमांस विक्री होत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी नेवासा यांनी तात्काळ पोलीस स्टाफ यांना सदर माहितीचा थोडक्यात आशय सांगून रवाना केले असता सदर पोलीस स्टाफ व पंच असे कुरेशी मोहल्ला, सलबतपुर या ठिकाणी गेले असता तेथे एक बाई खाली बसून तिचे समोर दोन तीन इसम उभे असल्याचे दिसले

गोमांस

सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर बाई गोमांस विक्री करत असल्याचे आढळून आल्याने सदर बाईस तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव रियानबी यासीन शेख वय 52 वर्ष राहणार सलबतपुर तालुका नेवासा असे सांगितले सदर महिलेचे महिला पोलीस व महिला पोलीस पाटील यांचे समक्ष झडती घेतली असता तिचे अंदाजे.6,500 /- रुपये किमतीचे गोमांस मिळून आले सदर गोमांस पंचासमक्ष जप्त करून सदर महिला विरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोमांस

सदरचे कामगिरी श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग, श्री सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षादिन पोलीस उपअधीक्षक, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पा तांबे, श्रीनाथ गवळी, अवि वैद्य, गणेश जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार, पोलीस पाटील रजिया शेख यांनी केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोमांस
गोमांस
गोमांस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोमांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *