नेवासा – जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून 31 मे रोजी नेवासा येथील प्रख्यात चित्रकार भरत कुमार उदावंत यांनी व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तंबाखूमुळे मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि स्वतःच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरू शकतो हे मानवाच्या नजरेत आणण्याचा माझा प्रयत्न आहे .या सामाजिक उपक्रमास कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ न घेता नेहमी सातत्याने 30 ते 35 वर्षांपासून मी समाज प्रबोधन करत आहे. यातून फक्त दोन टक्के समाजाने जरी धडा घेतला तरी माझ्या श्रमाचे यश मला मिळाल्यासारखे होईल .

तरुणाची वाया चाललेली शक्ती, व्यसनाधीनता, मरगळ, व्यभिचार, महिला अत्याचार ,उपासमार, दारिद्र्य यावर आळा बसून समाज आणि राष्ट्रहिताकरता माझ्या चित्रकलेतून मी प्रबोधन करत आहे .मी स्वतः जिल्ह्यात आणि राज्यात देखील असे उपक्रम राबवले असून तंबाखू विरोधी मोहीम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रवी भागवत, सत्यजित उदावंत यांनीही त्यांच्या या उपक्रमात हातभार दर्शवला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.