नेवासा – तालुक्यातील मक्तापूर रोडवरील जी के मंगल कार्यालय परिसरातील रहिवासी असलेली व मोलमजुरी करणाऱ्या महिलेने एका पतसंस्थेमध्ये आपल्या कष्टाची कमाई बचत म्हणून टाकली मात्र वारंवार पैसे देण्याची मागणी करून ही सदर पतसंस्था ही या महिलेच्या मागणी कडे दुर्लक्ष करत होती.शेवटी या महिलेने आपली कैफियत पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे मांडली.त्यांनी पतसंस्था चालकाला कायद्याच्या भाषेत दिलेल्या दणक्याने सदर मोलमजुरी करणाऱ्या त्या महिलेचे पैसे पतसंस्थेने दोन तासात परत केले.संतोष खाडे साहेबांच्या या कृतिशील न्यायाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की नेवासा तालुक्यातील मक्तापूर रोडवर असलेल्या जी के मंगल कार्यालय परिसरात विमल संजय सोनवणे ही महिला मोलमजुरी करून आपली व कुटुंबाची उपजीविका करत होती. आपल्या कष्टाच्या पगारातून दोन पैसे बचत करावी म्हणून या महिलेने मोलमजुरीतले पैसे साठवून एका पतसंस्थेत टाकले होते,या पतसंस्थेतच ही महिला सफाई कामगार म्हणून काम करत होती, आपला पगारही त्याच पतसंस्थेत टाकत होती असे एकूण जवळपास नव्वद हजार तिचे जमा झाले होते.
गरज पडेल तेव्हा ती पैशाची मागणी पतसंस्थेकडे करत होती मात्र कानाडोळा करून पतसंस्था व्यवस्थापनाकडून तिच्या मागणीकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली जात होती

शेवटी वैतागलेल्या या महिलेने नेवासा पोलीस स्टेशन गाठून कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोष खाडे साहेबांकडे डोळ्यात पाणी आणून आपली कैफियत मांडली तीन वर्षांपासून मी पैशासाठी चकरा मारते माझी चप्पल झिजली पण माझे पैसे पतसंस्थेने दिले नसल्याचे सांगितले.रडून आपली कैफियत मांडत असतांना पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे ही भावुक झाले त्यांनी पतसंस्था चालकांना बोलावून घेऊन चांगलेच खडसावले,या महिलेचे पैसे त्वरित जमा करा असा दम भरताच काही कालावधीत पतसंस्था व्यवस्थापणाकडून पैशाची तरतूद करण्यात येऊन सदरची रक्कम पोलीस उपअधीक्षक खाडे साहेबांनी स्व:त आपल्या हस्ते मोलमजुरी करणाऱ्या महिलेकडे सुपूर्त केले.खाडे साहेबांच्या या तत्पर कारवाईच्या न्यायाने महिलेच्या चेहऱ्यावर देव भेटल्याचा आनंद दिसून येत होता तर खाडे साहेबांनी मोलमजुरी करणाऱ्या महिलेला दिलेल्या या न्यायामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.