पाचेगाव फाटा – शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली .
समर्पण फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ करण सिंह घुले यांनी कार्यालयास मोफत गाळा उपलब्ध करून दिला .
नेवासा तालुका शेतकरी संघटनेमार्फत शेतकऱ्यांची अनेक कामे मार्गाला लावली जातात .त्यामध्ये वीज प्रश्न ,पाणी प्रश्न,पिक विम्याचे प्रश्न,शेतमालाच्या हवासे प्रश्न असे अनेक विषय हाताळले जातात .शेतकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या दैनंदिन समस्या संघटनेमार्फत सोडविण्याचा प्रयत्न केला जातो .त्यासाठी कार्यालयाची उपलब्धता झाल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे,डॉ करण सिंह घुले ,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे ,जिल्हा उपाध्यक्ष हरि अप्पा तुवर ,तालुकाध्यक्ष अशोक काळे, युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र काळे,दिलीप पवार,प्रकाश जाधव,साहेबराव पवार,कार्लस साठे, एडवोकेट बाळासाहेब कावळे ,एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसाठ ,एडवोकेट सागर सागडे,दादासाहेब नाबदे , किरण लंघे, सोमनाथ औटी ,अशोक नागोडे ,दत्तात्रय पाटील निकम,डॉ दादासाहेब आदिक , डॉ नवले , युवराज जगताप ,अनिल साळुंके ,अजित कर्डिले ,अशोक तांबे, विजय गायकवाड ,अशोक पोटे,भास्कर तुवर,कैलास पवार आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एडवोकेट अजित काळे यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून केले जाईल असे आश्वासित केले .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.