ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कृषि

मंगळापूर – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूत नेवासा तालुक्यातील मंगळापूर गावात दाखल झाले आहेत. ग्रामीण कृषी कार्यानुभव दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात कृषिदूत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.

सरपंच नामदेव शिंदे,उपसरपंच सोपान औटी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य, इतर ग्रामस्थ श्री. तुकाराम वाकचौरे, कचरू शिंदे, कुंडलिक मनाळ, दादासाहेब नरवडे, जनार्दन गव्हाणे, संदीप औटी, भाऊसाहेब गव्हाणे, कडूबाळ मनाळ उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीकपद्धती, नैसर्गिक संसाधने, रोग व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन व सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) इत्यादी विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन याबाबत माहिती दिली जाणार आहे.

कृषि

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे, उपप्राचार्य एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.बी.चौगुले, प्रा. एस.एस.हुरुळे, डॉ.एन. एन. विधाते,व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती कृषीदुतानी दिली.

या वेळी कृषिदूत आकाश काटेे, निखिल निकम, अभिषेक जगताप, सुजीत काळे, मिहीर नेहरकर व रितेश मगर हे विद्यार्थी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळापूर गावामध्ये कार्यरत राहतील.

कृषि
कृषि

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषि
कृषि

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *