नेवासा –तालुक्यातील माका गाव येथे कृषि महाविद्यालय , भानसहिवरेच्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात वास्तव्यास राहून ते शेतकऱ्यांना विविध कृषि विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या कृषिदुतांचे माका येथील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मार्गदर्शक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरभटमट सर व तसेच कार्यक्रम समन्वय प्रा. मनोज माने सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप सोनवणे सर असून या गावामध्ये कृषिदूत आवारे लक्ष्मीकांत, बडे अभिमन्यू ,गिरी रोहन , चौरे वैभव, गुंजाळ शुभम आणि दुसंगे गणेश हे विद्यार्थी आहेत. या कृषिदूतांचे माका गाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच सौ. विजया पटेकर व ग्रामविकास अधिकारी एल. डी. नांगरे तसेच सोपन घुले , अमोल पालवे, गोवर्धन रुपनर आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.