नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण विकास संस्था नेवासा फाटा (आय.टी.आय) येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून दीप प्रज्वलन आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.गंगाधर कर्डक, प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते सतीश बाळकृष्ण मुळे हे होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तमाम महाराष्ट्रातील व नेवासा तालुक्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

ते पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हे स्वराज्य उभा केले छत्रपती शिवरायांना स्वराज्य उभा करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु ते डगमगले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक संकटाला तोंड देत प्रत्येक संकटावर मात करत गड किल्ले मोहीम यशस्वीरित्या पार केल्या छत्रपती शिवरायांच्या या कारकिर्दीमुळे महाराष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांतात हे सर्व श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला जाते असे विठ्ठलराव लंघे पाटील बोलताना म्हणाले . तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण यापुढे आपल्याला जोपासत आपल्या राज्यामध्ये तसेच समाजामध्ये आपल्याला काम करायचे आहे असे आमदार लंघे बोलताना म्हणाले.
तसेच विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत अभिवादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी मंचावरती नेवासा यांनी तालुक्या विद्यमान आ.विठ्ठलराव लंघे पाटील, तालुक्याचे तहसीलदार संजय बिराजदार, विद्यालयाचे प्राचार्य विकासजी थोटे सर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे पाटील, राहुल पवार ,डॉ.निकाळजे सर, जालिंदर गोरे, आप्पासाहेब कदम, निलेश मकासरे,तसेच विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मंत्री कौशल्य उद्योगता व नाविन्यता तसेच महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.