ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
तंबाखू

नेवासा – आज दिनांक. 11/06/2025 रोजी श्री.संतोष खाडे,परी. पोलीस उपअधीक्षक पोलीस ठाणे नेवासा यांना त्यांचे गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की मौजे नेवासा फाटा राजमुद्रा चौक येथील सुपर पान स्टॉल चे बाजूला दोन इसम सुगंधी तंबाखू गुटखा विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ व पंचासमक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर टपरीच्या आडोशाला दोन इसम एक पिशवी घेऊन दिसले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) दानिश रियाज पठाण 2) सईद शौकत पटेल दोन्ही.रा.नेवासा खुर्द असे सांगून त्यांच्या ताब्यातील पिशवीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधी तंबाखू / गुटखा असे एकूण.3,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

तंबाखू

सदरचा मुद्देमाल पोलीस हवालदार राठोड यांनी जप्त करून वरील दोन इसमा विरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री सोमनाथ घाग्रे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री संतोष खाडे, परिविक्षादिन पोलीस उपअधीक्षक, पोलीस हवालदार संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल भारत बोडके, पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पालवे, पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे यांचे पथकाने केली आहे…

newasa news online
तंबाखू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तंबाखू
तंबाखू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तंबाखू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *