ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अध्यक्ष

पाचेगाव फाटा – जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक व अध्यक्ष शिवाजीराव आप्पा कपाळे यांची तर उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी वासुदेव काळे बांनी शिवाजी (आप्पा) कपाळे यांच्या नावाची सुचना मांडली. ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिले. तर, व्हाइस चेअरमन पदासाठी अजिनाथ हजारे यांच्या नावाची सूचना मिलिंद गंधे यांनी करून विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदाकिनी ठोकळ यांनी काम पाहिले.

अध्यक्ष

यावेळी स्थैर्यनिधी संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी उपाध्यक्ष वसंत लोढा, नूतन संचालक वासुन काळे, वसंत कवाद, उमेश मोरगावक ज्ञानदेव पाचपुते, मिलिंद गंधे, विठ्ठल अभंग पुखराज पिपाडा, आशुत पटवर्धन, राणीप्रसाद मुंदडा, राज खटोड, सुशीला नवले आदी उपस्थि होते. यावेळी नूतन पदाधिकारी संचालकांचा सत्कार करण्यात आला.नूतन चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले, संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी चांगल्या पद्धतीने काम करून सोडवले आहे सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे व सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे अशी ग्वाही दिली. मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष व लोढा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिवाजीराव (आप्पा)कपाळे यांच्या या निवडीमुळे नेवासा येथील साई आदर्श मल्टीस्टेटचे शाखाधिकारी लोहकरे संदीप ,कॅशियर दारकुंडे राहुल,क्लार्क कांबळे वैभव विजय पाटोळे, सतिश,ढाकणे सत्यम,हिरवे प्रसन्न यांच्या सह नेवासा येथील आदर्श मल्टीस्टेटचे सर्व खात्यादार यांनी अभिनंदन केले.

अध्यक्ष
अध्यक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अध्यक्ष
अध्यक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *