ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अंगणवाडी

नेवासा – एका बाजूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने व शिक्षण विभागाच्या वतीने लोकप्रतिनिधी तसेच गावातील गावातील बडे जानते नेते 15 जून रोजी उघडलेल्या महाविद्यालय व प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे शाळेमध्ये स्वागत करून विद्यार्थ्यांचे उत्साह वाढवण्याचे काम करताना पाहावयास मिळत आहे.

परंतु नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील अंगणवाडीमध्ये डुकरांच्या दुर्गंधीने बाल वयातील बालकांचे स्वागत केले आहे सध्याला महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उपक्रमांमध्ये मोठा प्रतिसाद महाराष्ट्रभर उपक्रम राबवताना पाहावयास मिळत आहे .

अंगणवाडी

यामध्ये आमदार खासदार लोकप्रतिनिधी मंत्री गाव पातळीवरील नेते मोठी आपली पाठ थोपटताना व लहान मुलांचे व शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच वया पुस्तक देऊन स्वागत करताना पाहावयास मिळत आहे परंतु एका बाजूला नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील ज्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांची शिक्षणाची व भविष्याची सुरुवात होते त्याच ठिकाणी मेलेल्या डुकरांची दुर्गंधी पावस मिळत आहे याला जबाबदार कोण असा हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

सलाबतपुर ग्रामपंचायत च्या हद्दीमधील राजवाडा परिसरातील मक्तेदार संस्था इंटरनॅशनल नॉलेज फाउंडेशन नाशिक यांच्या अंतर्गत बांधकाम केलेल्या अंगणवाडीची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून या अंगणवाडीमध्ये मेलेले डुक्कर मेलेले कुत्रे तसेच आसपासचे नागरिक शौचालयासाठी येऊन बसतात अशी परिस्थिती शाळेचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पहावयास मिळाली ज्या ठिकाणी मुलाचे भविष्य कसे घडणार आहे त्या ठिकाणी अशी दुर्गंधी असल्यास लहान मुले कसे शिक्षण घेणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

अंगणवाडी

एका बाजूला महाराष्ट्र शिक्षण विभागाने मुलाचे स्वागताचा एका बाजूने उपक्रम राबवताना दिसत आहे .
परंतु एका बाजूने नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील अंगणवाडीची अशी परिस्थिती निर्मान झाली आहे तसेच बालकांचे भविष्य धोकात असल्याचे चित्र दिसत आहे तसेच आरोग्याचाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. तरी याला जबाबदार ग्रामसेवक व ग्रामपंचायतच तसेच सलाबतपुर आरोग्य विभाग असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक ,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी आपल्या पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी एकनाथ नगरे, आप्पासाहेब गोरे ,बाळासाहेब निकम, सौ शोभा निकम अदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार व ग्रामस्थांनी ग्रामसेवक भिसे भाऊ साहेबांना फोनवरून विचारणा केली असता ग्रामसेवक भाऊसाहेब पत्रकाराला म्हणाले की मी आणून टाकले का तिथे डुक्कर माझा काही संबंध नाही.

अंगणवाडी
अंगणवाडी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अंगणवाडी
अंगणवाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अंगणवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *