जेऊर हैबती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक व कृषी महाविद्यालय भानसहिवरे अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषीदूतांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सूर्यनमस्कार व ओम उच्चाराने करण्यात आली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक व कृषीदूतांनी विविध योगासने केली. योग प्रशिक्षक म्हणून श्री. शेंडगे सर आणि कृषीदूतांनी मार्गदर्शन केले व योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री निकम सरांनी व योग प्रशिक्षक श्री आरगडे सर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. कृषीदूतांनी ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम हाती घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषीदूतांचे व शाळेच्या शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.