ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आरोपी

नेवासा – दि.२०/०६/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजे सुमारास बोधेगाव ता. शेवगाव येथील हॉटेल राका समोर एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे अशी बातमी शेवगाव पोलीसांना मिळाल्याने बातमीतील नमुद ठिकाणी मा.श्री सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव, पो.नि.श्री संतोष मुटकुळे, पोसई महाले असे यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देवुन मृतअवस्थेत पडलेल्या इसमाचे नाव गाव निष्पन्न करुन सदर इसमास ग्रामिण रुग्णालय शेवगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केल्याने सदर मयत इसम नामे कैलास काकासाहेब काकडे वय-४२ रा. हातगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर याचा भाऊ विलास काकासाहेब काकडे रा. सदर याचे वगैरे मजकुरच्या हकिगत वरुन शेवगाव पोलीस ठाणे गुरनं ५५२/२०२५ भारतीय न्यास संहीता कलम १०३(१) प्रमाणे दि.२२/०६/२०२५ रोजी दाखल करण्यात आला असुन गुन्हयातील हकिगत की मयत कैलास काकासाहेब काकडे यास दारु पिण्याचे व्यूसन असुन त्याचेकडे लोकांचे उसने पैसे झाल्याने त्याने सुमारे १५ दिवसापुर्वी त्याचे वाटयाला आलेली एक एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमिन विकली होती.

आरोपी

दि.१९/०६/२०२५ रोजी यातील मयत कैलास व त्याची पत्नी हे बोधेगाव येथे आले होते मयत कैलास याने पत्नी हीस तु छत्रपती बँकेचे समोर थांब मी बाथरुमला जावुन येतो परंतु पती हे लवकर माघारी न आल्याने पत्नी ही घरी कांबी येथे आली. त्यानंतर दि.२०/६/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजे सुमारास मयत कैलास काकासाहेब काकडे हा बोधेगाव गावचे शिवारातील शेवगाव ते गेवराई जाणारे रोडचे कडेला हॉटेल राकाचे समोर कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी टणक हत्याराने पाठीवर, डोक्यावर जबर मारहाण करुन जिवे ठार मारुन खुन केला आहे.

आरोपी

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. संतोष मुटकुळे सो पोलीस निरीक्षक शेवगांव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन वेगवेगळी दोन पोलीस पथके बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी भागात रवाना करण्यात आले होते. तपास चालु असताना गोपणीय बातमीदार व तांत्रिक व भौतिक पुराव्याचे आधारे नमुद गुन्हयातील संशयित आरोपी नामे सिध्दांत मंगेश गवारे वय-२३ वर्षे रा. बोधेगाव ता. शेवगाव यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी नामे सिध्दांत मंगेश गवारे वय-२३ वर्षे रा. बोधेगाव ता. शेवगाव यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करुन पुढील कार्यवाही करीत आहोत.

आरोपी

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री संतोष मुटकुळे, पोसई प्रविण महाले, पोसई बाजीराव सानप, पोहेकों किशोर काळे, पोहेकॉ/चंद्रकांत कुसारे, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोना ईश्वर गर्जे, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ राहुल खेडकर, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ एकनाथ गर्कळ, पोकाँ संपत खेडकर, पोकों ईश्वर बेरड, पोकों राजु बडे, पोकों भगवान सानप, पोकों देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोनि श्री संतोष मुटकुळे हे करीत आहेत

आरोपी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *