ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पुरस्कार

नेवासा – देशातील साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर संस्था शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) यांच्यावतीने यंदाचा ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’ श्री. प्रभाकर उत्तमराव शिंदे, अध्यक्ष – पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, संभाजीनगर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संस्था स्थापनेच्या १००व्या वर्धापनदिनानिमित्त, त्यांच्या उल्लेखनीय औद्योगिक योगदानाबद्दल दिला जाणार आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधीन राहून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या STAI ही संस्था १९२५ पासून साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. १५ जुलै २०२५ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर’ येथे होणाऱ्या STAI च्या ८३व्या शताब्दी वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात, मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

पुरस्कार

श्री. प्रभाकर शिंदे यांनी पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून साखर उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादकता वाढ आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या अनेक उपक्रमांतून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची दखल घेण्यात आली आहे.

या निवडीमुळे महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, प्रभाकर शिंदे यांचे विविध राजकीय सामाजिक धार्मिक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पुरस्कार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *