गेल्या सहा महिन्यापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे, नागरिकांकडून पूर्ण 365 दिवसाची पाणीपट्टी आकारण्यात येते परंतु पाणीपुरवठा दीडशे दिवसही पूर्ण होत नाही आहे,नागरिकाच्या समस्येशी नगरपंचायतला काही देणे घेणे नाही असे वागत आहे,प्रशासकराज आल्यापासून नागरिकांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाही आहे,तरी दोन दिवसात सदर पाणीपुरवठा नियमित करावा अन्यथा नगरपंचायत कार्यालय मध्ये मोठे आंदोलन करण्यात येईल यांची गांभीर्याने दखल घ्यावी अश्या मागणीचे निवेदन नगरपंचायत अधिकारी तळेकर मॅडम यांना देण्यात आले.यावेळी नगरसेवक संदीप बेहळे हेही उपस्थित होते.

जेव्हापासून प्रशासकराज लागले आहे, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाला नेवासा शहरातील नागरिकांशी काहीही घेणे राहिले नाही आहे.
राजेंद्र वसंतराव मापारी, नगरसेवक
नागरिकांची गैरसोय नगरपंचायतने लवकरात लवकर टाळावी अन्यथा आंदोलन करणार.
संदीप अण्णासाहेब बेहेळे
नगरसेवक


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.