नेवासा न्यायालयाचा आदेश; चालक, विमा कंपनीला दंड
नेवासा – दोन चारचाकींच्या अपघातात मरण पावलेले परेश मुरलीधर गडपायले, सोनिका भीमराव अवसरमोल यांच्या वारसांना व जखमी शिखा मुरलीधर गडपायले यांना चारचाकी चालक, मालक व विमा कंपनी यांनी दावा दाखल केल्यापासून संयुक्तरीत्या ७ टक्के व्याजासह ६ कोटी १५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश नेवासा मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य तथा जिल्हा न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी दिला.

कांगोणी खरवंडी शिवारात पुण्याकडून संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला (एमएच १४ जेएक्स ४०२४) ९ जून २०२२ रोजी पुण्याकडे जाणारे
चारचाकी (एमएच १४, एफएस ८८९९) वाहन वेगात दुभाजकावर आदळून धडक दिली होती. या अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाले होते. यानंतर मयताच्या वारसांसह व जखमींनी नेवासा न्यायालयात अॅड. विजय यादव व अॅड. संदीप कापसे यांच्यामार्फत नुकसानभरपाईसाठी तीन वेगवेगळे दावे केले होते. अपघाताच्या वेळी मयत परेश गडपायले (वय ३२ वर्षे) यांना दरमहा एक लाख ७१ हजार वेतन मिळत होते आणि पत्नी, मुलगा व आई-वडील त्यांच्यावर अवलंबून होते, तर मयत सोनिका अवसरमोल या अपघाताच्या वेळी अविवाहित होत्या. त्यांच्यावर आई-वडील अवलंबून होते. परेश व सोनिका यांचा मृत्यू चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याने चालक, मालक आणि विमा कंपनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.