नेवासा – भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या वर कथित सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, तथ्यहीन, बिनबुडाचे असुन देसाई या नेहीमी भाजप व हिंदुत्ववादी विरोधात सुपारी घेऊन बोलत असतात. दिनकर यांच्या वर बेताल व चारित्र्य हनन करणारे आरोप करून देसाई यांनी स्वतःची लायकी सिद्ध केली आहे,जिल्ह्यातील त्यांचा भाजप व हिंदुत्ववादविरोधात बोलविता धनी वेगळा आहे असे भाजप नेते अनिल पा.ताके यांनी स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यात विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर हे संगटनेच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असून संघटना बांधणी उत्तमरीत्या सुरू आहे.अलीकडे भाजपची जिल्ह्यात मोठ्या प्रमानावावर ताकद वाढलेली आहे.विधानसभा निवडणुकीत अनेक दिगग्ज पराभूत झालेले आहेत,विरोधक या भागात पूर्णपणे निष्प्रभ झालेले आहेत, या भागातील विरोधकांची पाया खालील वाळू घसरली आहे,ना.विखे यांच्या करिष्मा मुळे जिल्ह्यातील अनेक महत्वाची सत्तास्थाने भाजप व महायुतीच्या अधिपत्याखाली आली आहे व येत आहे यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या विरोधकांनी जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना टार्गेट करायचे ठरवले की काय अशी शंका येते.असेही अनिल ताके यांनी स्पष्ट केले.

तृप्ती देसाई यांनी यापूर्वी देखील नेहमीच हिंदुत्ववादी विरोधात भूमिका घेत भापजच्या विरोधी गरळ ओकलेली आहे.देसाई यांनी नितीन दिनकर यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातील कथित व्हिडीओ व्हायरल करून नितीन दिनकर यांचीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा भाजपची बदनामी केलेली आहे.त्यांनी जिल्ह्यातील भाजप च्या विरोधात लोकांमध्ये बुद्धिभेद करून गैरसमज पसरविण्याचे साठी काही विरोधकांकडून सुपारी घेत दिनकर याचे वर चारित्र्यहनन करणारे बिनबुडाचे आरोप केलेले असून आपण देसाई यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करीत असून त्यात कोणतेही तथ्य नाही असेही अनिल ताके म्हणाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.