ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सी ए

नेवासा – नुकत्याच सी ए च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नेवासा येथील व्यापारी शशिकांत नळकांडे यांची कन्या कु.प्रतिक्षा नळकांडे हिचा नेवासा येथील लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
      पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील हे होते.तर माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप,उद्योजक संभाजीराव पवार,पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महंमदभाई शेख टेलर,संचालक विजय गांधी,बजरंग ईरले,जेष्ठ व्यापारी शशिकांत नळकांडे,राजेंद्र उंदरे,संचालक दीपक दुधे, जनसेवक राजेंद्र मापारी,अंबादास ईरले,बाळासाहेब मारकळी,शंकर ओहोळ,शंभूराजे जंगले,रामनाथ जाधव, जालिंदर गवळी,बाबासाहेब कोरेकर,अशोक डहाळे, विशाल जायगुडे यावेळी उपस्थित होते.

सी ए


     यावेळी कठीण समजल्या जाणाऱ्या सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.प्रतिक्षा नळकांडे हिचा शाल बुके व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मण नाबदे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
   यावेळी बोलतांना चेअरमन नंदकुमार पाटील म्हणाले की अत्यंत कठीण असलेली सीए परीक्षेत प्रतिक्षा हिने यश संपादन केले आहे ही नेवासकरांसाठी भूषणावह बाब आहे,प्रतिक्षा हिने यासाठी खूप मेहनत घेतली त्यासाठी तिचे आईवडीलांनी तिला खंबीरपणे साथ देत तिला उंच भरारी घेण्यासाठी तिच्या पंखांना बळ दिले यासाठी त्यांनी वडील शशिकांत नळकांडे व आई सुरेखा नळकांडे यांचे अभिनंदन केले व कु.प्रतीक्षा हिच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
      यावेळी विजय गांधी,संभाजी पवार यांनी मनोगत व्यक्त करत कु.प्रतिक्षा हिच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.पत्रकार अशोक डहाळे यांनी सूत्रसंचालन केले तर व्हाईस चेअरमन महंमदभाई शेख टेलर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

सी ए
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सी ए
सी ए

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सी ए

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *