मुळा एज्युकेशन

सोनई- शैक्षणिक वर्ष 2025–26 पासून मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या नवीन अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) महाविद्यालयास महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचलनालय, एमएसबीटीई, मुंबई तसेच एआयसीटीई,नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. परिसरातील ग्रामीण भागातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात चार कोर्सेसच्या पर्यायासह प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी इंजीनियरिंग पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी सोनई व परिसरातील मुला–मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी जावे लागायचे यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची होणारी धावपळ– गैरसोय लक्षात घेता सोनई गावातच नवीन पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू केल्याचे मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष मा. उदयन गडाख यांनी सांगितले.

मुळा एज्युकेशन

विविध क्षेत्रात (AI) कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची सुरू असणारी वाटचाल बघता या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या उज्वल संधी नक्कीच प्राप्त होण्यास मदत होणार आहे, यामध्ये निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, अद्यावत संगणक कक्ष, इंटरनेट/वाय-फाय सुविधा, मुला– मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह, जिमखाना त्याचबरोबर तज्ञ अनुभवी शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन आदी.सुविधा देण्यात आल्या आहेत.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्याकरिता ऑनलाइन अर्जात महाविद्यालयाची निवड करताना महाविद्यालयाचा निवड संकेतांक (डीटीई कोड) 5663 असेल तसेच कोर्सेसवाईज ब्रांच कोड पुढील प्रमाणे असतील 1.कम्प्युटर इंजिनिअरिंग (566324510) 2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (566324610) 3.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (566337210) 4. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (566399810) असतील, यामध्ये कम्प्युटर इंजीनियरिंग अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 120 असून इतर तीन अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांची आहे. अधिक माहितीकरिता विद्यार्थ्यांनी व पालकांनी मुळा एज्युकेशन कॅम्पस मधील पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा 7720013303, 9960205257 व 9011326894 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

मुळा एज्युकेशन
मुळा एज्युकेशन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुळा एज्युकेशन
मुळा एज्युकेशन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुळा एज्युकेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!