सोनई – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंदच्या सामान्य कुटुंबातील सुपुत्राची गगन भरारी .डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा.अकबर कासमभाई इनामदार यांना फिजिक्स (भौतिकशास्त्र ) या विषयात पीएचडी प्रधान केली आहे. त्यांनी डॉ. सतीश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली “स्ट्रक्चरल ऑप्टो एलेक्ट्रोनिक अँड कॅटलिटीक प्रॉपर्टीज ऑफ व्हेरियस मेटल ऑक्साईड नॅनो पार्टिकल सिंथेसाईझ बाय फ्लेम पायरोलिसीस मेथड” या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला.

त्यांच्या या यशाबद्दल संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वास्थ शरयू देशमुख यांच्यासह खेडले परमानंद येथील ज्येष्ठ नागरिक सूर्यभान आधाव ,मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर ,भाऊसाहेब मोकाशी,मोहम्मद इनामदार ,नय्युम इनामदार ,समाजसेवक पत्रकार संभाजी शिंदे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद चे मुख्याध्यापक लहानु ढाले सर वर्ग सर्व शिक्षकांच्या वतीन समाजातील प्रत्येक स्तरातून इनामदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.