नेवासा – समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी २०२५-२६ साठी परीक्षेचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी – १ व संकलित मूल्यमापन चाचणी – २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन पडताळणी होऊन – अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.