सोनई /शनिशिंगणापूर– अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेण्यास दुरापास्त होतो. म्हणून नेवासा येथील निस्वार्थी वृत्तीने श्री. क्षेत्र शनेश्वर देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ व सौं. सुरेखा बल्लाळ यांच्या हस्ते नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरातील गरजूवंत वारकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना श्री परशुराम प्रतिष्ठान तर्फे अभ्यास करण्यासाठी टेबल वाटप करण्यात आले. श्री बल्लाळ यांच्या संकल्पनेतून केलेली मदत ही कौतुकास्पद असून सर्वत्र वारकरी तसेच सर्व क्षेत्रातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात सामाजिक दानशूर व्यक्तींनी पुढे करावा,असे संस्थांचे हभप देविदास महाराज म्हस्के यांनी मत व्यक्त केले.

संस्थांमध्ये माजी कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ व सौ सुरेखा बल्लाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नुकतेच वाटप करण्यात आले. श्री बल्लाळ म्हणाले की शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो, आई-वडील गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून यश संपादन करा,आज गरीब विद्यार्थ्याकडे काहीशा प्रमाणात दुर्लक्ष केले जाते, ही बाब लक्षात घेऊन निस्वार्थ मदत व त्यांची शिक्षणाची अट न ठेवता विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे हा उद्देश समोर ठेवून परशुराम प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमास श्री परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग देशपांडे, संजय देशपांडे, जयंत देवचक्के, गौरव देशपांडे, आदी प्रतिष्ठानचे सदस्य, व मान्यवर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.