नेवासा – नेवासा येथील सावित्रीबाई फुले- फातिमा शेख वाचनालयाच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने प्रतिमेस पुष्पांजली अर्पित करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले.साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याने त्यांच्या कार्यातून समाजाने स्फूर्ती व प्रेरणा घ्यावी असे आवाहन दलित बहुजन समाजाचे युवा नेते अँड.संजयनाना सुखदान यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा येथील नगरपंचायत चौकात दलित बहुजन समाजाचे नेते विकास चव्हाण यांच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जयंती कार्यक्रमाचे संयोजक विकास चव्हाण यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य त्यांनी
विषद केले.

यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,रामभाऊ केंदळे,गफूरभाई बागवान, इंजिनिअर सुनीलराव वाघ,समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ,बहुजन नेते अँड.संजयनाना सुखदान,शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीपराव सरोदे,सुरजितसिंग सचदे,युवा नेते सचिन वडागळे,भाजपचे शहर मंडल मनोजअण्णा पारखे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पित करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी चेअरमन बाळासाहेब पाटील,माजी सरपंच सतीश गायके,अँड. सुदाम ठुबे,दिनेश व्यवहारे, प्रविण सरोदे,फिलिप वडागळे, डेव्हिड साळवे,सनी चव्हाण, रणजित सोनवणे,अनिल सोनवणे,गौरव चव्हाण,संदीप बेहळे,सुभाष चव्हाण, मधुकर वाघमारे,बापू जामदार,आदिनाथ पटारे,रामा चव्हाण,प्रभाकर सरोदे,लक्ष्मण दाणे यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर अनिल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने नगरपंचायत चौकात शामियाना उभारण्यात आला होता.यानिमित्ताने असंख्य नागरिकांनी
प्रतिमा पूजन करत पुष्पांजली अर्पण करून साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
चौकट:-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून देशातील लाखो नागरीकांची मागणी असून जन भावना लक्षात घेऊन साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी केंद्र शासनाने भारतरत्न जाहीर करावा अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

