गणेशवाडी – युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांच्या वतीने लांडेवाडी येथे आर्थिक समावेशन मेळावा घेण्यात आला. आर्थिक समावेशन म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गरीब, वंचित व ग्रामीण भागातील लोकांना बँकींग व आर्थिक सेवा सुलभ , परवडणाऱ्या आणि सुरक्षित पध्दतीने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीला आर्थिक विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे, गरीबी कमी करणे, सामाजिक समता साधणे, लोकांना त्यांच्याच पैशाचा योग्य वापर करता आला पाहिजे, सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे .

आर्थिक समावेशन म्हणजे केवळ बॅक खाते उघडणे नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. या मुळे आर्थिक विकास अधिक समावेशक आणि शाश्वत होतो असे सोनई बॅक शाखाधिकारी मनोजकुमार गोरे यांनी बोलताना सांगितले.बॅक मित्र यांनी या ठिकाणी पाॅज मशीन द्वारे खाते खोलणे किती सोपे असते हे देखील यावेळी याद्वारे करण्यात आले. या वेळी शाखेचे ग्रामीण विकास अधिकारी हनमंत झांजे,अहील्यानगर क्षेत्रीय कार्यालयाचे विजय चव्हाण, बॅक मित्र भारत पालवे, जनार्दन पवार, सरपंच सुवर्णा दरंदले उप. सरपंच संजय दरंदले, पोलीस पाटील आसाराम कोरडे, भाऊसाहेब लांडे, शशिकांत लांडे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.