पाणी योजना वीज कनेक्शन बंदच्या प्रश्नांवर हजारो ग्रामस्थांसह केले होते आंदोलन…
अहिल्यानगर – नेवासा तालुक्यातील सोनई,करजगावंसह 16 गावांसाठी थेट मुळा धरणातून करण्यात आलेली पाणी योजना सुरळीत सुरू राहून पाणी योजनेत समाविष्ट प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी योजनेच्या मंजुरीपासून माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी पाठपुरावा करत सातत्यपूर्ण लढा दिलेला आहे. पाणी योजना सुरू झाल्यानंतर थकीत झालेल्या वीज बिलामुळे ऐन टंचाईत पाणी योजनेचे वीज कनेक्शन कुठलीही पूर्वसूचना न देता कट करण्यात आले होते.
यामुळे सोनई, करजगावंसह 16 गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती.माणसे,जनावरे यांचे प्रचंड हाल होत होते.
पाणी योजनेचे वीज कनेक्शन तातडीने जोडून पाणी योजना सुरू करावी व थकीत वीज बिलाचा बोजा नागरिकांवर न लादता तो शासनाने भरावा व नागरिकांची तहान भागावी यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी राहुरी,शनिशिंगणापूर राष्ट्रीय मार्गावर महिला भगिनी व परिसरातील हजारो नागरिकांसह भर उन्हात तब्बल 3 तास हंडा मोर्चा व रास्तारोको आंदोलन केले होते व तात्काळ पाणी योजना सुरू करण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. पाणी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्यामुळे माजी मंत्री शंकरराव गडाखांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर विषयावर अहिल्यानगर जिल्हा कोर्टाने शंकरराव गडाख यांना समन्स बजावून गुरू दि 7 ऑगस्ट 2025 रोजी
कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते त्यानुसार शंकरराव गडाख कोर्टात हजर राहिले अहिल्यानगर कोर्टात न्यायमूर्ती श्री जी .जी सोनी यांच्या कोर्टासमोर समोर फौजदारी केसची सुनावणी घेण्यात आली व यात शंकरराव गडाख यांना व्यक्तिगत जातमुचलक्यावर जमीन मंजूर करण्यात आला असून या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी तारीख देण्यात आली आहे.सदर प्रकरण हे चौकशीला लागल्याने या प्रकरणात आता शंकरराव गडाख यांना न्यायालयाच्या खेटा माराव्या वारंवार लागणार आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने ऍड संजय दुशिंग ,ऍड संजय वाल्हेकर यांनी काम पाहिले.
गडाख अन कोर्टाच्या खेटा..
नेवासा तालुक्यातील पाणी योजना, पाट पाणी विषयावर माजी मंत्री गडाख यांनी अनेक आंदोलने केले आहेत
यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे प्रलंबित असून त्यामुळे गडाखांना न्यायालयाच्या खेटा वारंवार माराव्या लागणार आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

