नेवासा –नेवासा पोलिस ठाण्यात आज सायंकाळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. पाटील यांनी यापूर्वी मुंबई उपनगरात काही वर्षे, तसेच जामखेड येथे दोन वर्षे उत्कृष्ट काम केले आहे.
सध्या ते अहिल्यानगर नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलिस निरीक्षक जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सत्कार केला. जातीय सलोखा, चोरटी वाळू वाहतूक, दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या, तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत व नेवासे फाटा येथील अवैध धंदे नेस्तनाबूत करून शांतता ठेवण्याचे आवाहन पाटील यांच्यापुढे असणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.