नेवासा व्यापारी कमिटी च्या प्रयत्नांना मोठे यश
नेवासा – एक महिन्यापूर्वी शहरात स्थापन झालेल्या व्यापारी कमिटीच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत आहे.काल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना नेवासा व्यापारी कमिटी तर्फे शहरातील बाजारातळ,बस स्टॅन्ड व जिल्हा परिषद च्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी bot तत्वावर व्यापारी संकुल उभारून प्राधान्याने ज्यांची तिथे दुकाने आहेत त्यांना गाळे देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले होते.याची त्वरित दखल घेऊन त्यांनी नगर पंचायत चे सीइओ संतोष लवांडे यांना सर्व व्यवसायिकांची यादी तयार करून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या.तसेच बस स्टॅन्ड व जिल्हा परिषद च्या जागेवर व्यापारी संकुल बांधणे बाबत दोन वेगळे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यामुळे शहरातील अतिक्रमण चा विषय लवकरच संपून अतिक्रमण मुक्त बाजारपेठ होईल अशी आशा व्यापारी कमिटीस आहे.
यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत लवकरच व्यापारी मेळावा घेणार असल्याचे व्यापारी कमिटी तर्फे सांगण्यात आले. यावेळी व्यापारी कमिटी चे महेश मापारी, मनोज पारखे, रुपेश उपाध्ये, संदीप आलवणे,कुणाल मांडण, पिंटू परदेशी,सलीम शेख, सचिन सावंत हे सदस्य उपस्थित होते तसेच अशोक जाधव,शिवा मोरे,घोरपडे टेलर,धनंजय औटी,असलम मणियार,गणेश व्यवहारे व इतर व्यापारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.