नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त नेवासा शहरातील युवा नेते स्वप्निल मापारी यांच्या संकल्पनेतून भव्य निबंध स्पर्धा जिल्हा परिषद मुलींची पाक शाळा येथे केली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र हा निबंधाचा विषय होता, तरी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचे मठाधिपती वेदांतचार्य श्री. देविदास जी म्हस्के महाराज, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजयजी लखवाल साहेब, सह गटविकास अधिकारी पाटेकर साहेब,कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक राजेंद्र मापारी,मुख्याध्यापिका मालन कोळपकर यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,

यावेळी विद्यार्थ्यांना वेदांताचार्य म्हस्के महाराज, गटविकास अधिकारी संजयजी लखवाल साहेब,सह गटविकास अधिकारी पाटेकर साहेब,युवानेते स्वप्निल मापारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी अनिल शिंदे,योगेश रासने,जालू गवळी,रुपेश उपाध्ये,विवेक नळकांडे,आशिष कावरे,शालेय कमिटीचे सुहास पठाडे,दीपक धोत्रे,सतीश म्हस्के,जयवंत मापारी,सचिन कदम,विशाल काळे,बिट्टू धनवटे,आरिफ शेख,तेजस डोखळे, दामोधर पवार,शिक्षक विजय साळुंके, सुधाकर झिने,शरद मचे,वैशाली कुलट,मनीषा जवने,ज्योती बोरुडे, वर्षा जगताप आदी सह नागरिक होते. कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते स्वप्निल मापारी यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदान घेऊन करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.