नेवासा – आज नेवासा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगर उत्तर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील व आयटी सेल च्या जिल्हाध्यक्षपदी(प्रसिद्धी प्रमुख) आदिनाथ पटारे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा शहर भाजप कार्यालय येथे त्यांचा सन्मान नेवासा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केला की प्रामाणिक व संघर्षमय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी पक्षाने कायमच योग्य न्याय दिलेला आहे

त्याचाच उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच नवीन जाहीर झालेले जिल्हा कार्यकारिणी मध्ये नेवासा तालुक्याला मानाचे स्थान देण्यात आले .त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेआहे. त्याप्रसंगी नेवासा भाजप शहराध्यक्ष मनोज अण्णा पारखे, प्रदेश कार्यकारणी सदस्य निरंजन भाऊ डहाळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाजी लष्करे, सुभाष पवार, व्यापारी सेलचे शहराध्यक्ष मनोज डहाळे, शंकर कनगरे,सतीश वाखुरे,सुधाकर शेंडे , आकाश कुसळकर आदि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

