संतोष खाडे

गणेशवाडी – पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांची बदली झाल्यानंतर सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्या जोमाने अवैध धंदे सुरू झाले असून त्यामध्ये गावठी दारू, देशी विदेशी दारू, मटका, जुगारा अड्डे, अवैद्य गौण खनिज वाहतूक सुगंधी ताबाखु, मावा, गुटखा नव्या जोमाने हे धंदे सुरू झाले आहेत उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या काळामध्ये सुगंधी तंबाखू माव्या वाल्याने आपल्या टपऱ्या बंद करून घेतल्या होत्या मात्र संतोष खाडे यांची बदली होतात हळूहळू हे धंदे पूर्व पदावर आले आहेत स्थानिक पोलिसांना हाताशी धरून व स्थानिक गुन्हे शाखेला चिरीमिरी देऊन हे धंदे पहिल्यापेक्षा दुपटीने जोमात सुरू झाले आहे त्यामुळे संतोष खाडे सारखा अधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असावा अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये असून त्यांच्यामुळे काही दिवस का होईना सुगंधी तंबाखू मावा गुटखा हे धंदे पूर्णपणे बंद झाले होते त्यामुळे स्थानिक पोलिसांची वरची कमाई बंद झाली होती आता चौका चौकात आणि गल्लीबोळा मटक्याच्या टपऱ्या दिसू लागले आहे

संतोष खाडे

स्थानिक गुन्हे शाखेचा यावर कुठलाच अंकुश नसल्याचे दिसून येतात स्थानिक गुन्हे शाखा ही फक्त महिन्याला ठराविक वेळेलाच या भागात चमकते ती कशाला हे सर्वसामान्य नागरिकांना आता कळून चुकले आहे स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्हा पोलीस दलाची शान म्हणून ओळखले जाते मात्र त्यांच्या काळामध्ये आता जे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होतील ते संतोष खाडे यांच्या टीम मध्ये देखील होते खाडे असताना हे धंदे बंद करण्यासाठी या टीम मध्ये कर्मचारी अधिकारी पुढे होते मात्र आता काय झाले केवळ रक्कम वाढवून घेऊन हे धंदे पुन्हा सुरू झाले आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला संतोष खाडेसारखा खमक्या अधिकाऱ्याची आवश्यकता आहे खाडे यांच्या काळामध्ये हे होऊ शकते मात्र आता का नाही असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे आता स्थानिक गुन्हे शाखेचे आर्ट कोणी बांधले हे कळायला मार्ग नाही

संतोष खाडे
संतोष खाडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतोष खाडे
संतोष खाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतोष खाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!