कोणतीही कारवाई न केल्यास कोणत्याही क्षणी महिला गिडेगाव ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे महिलांनी प्रशासनाला केला आहे.
नेवासा तालुक्यामधील गिडेगाव येथील अवैद्य दारू विक्री संदर्भातील बंदी घालण्यासाठी गिडेगाव येथील महिला पुढे सरसावलेल्या असून आज नेवासा पोलीस स्टेशन तसेच नेवासा तहसील कार्यालय येथे दारूबंदी संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदनाची प्रत नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर ,जिल्हाधिकारी अहिल्यानगर ,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर ,तहसीलदार नेवासा, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव ,स्थानिक गुना शाखा अहिल्यानगर ,दारु उत्पादन शुल्क अधिकारी नेवासा यांना देण्यात आले आहे.

या निवेदना सोबत गिडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा 28-8- 2025 रोजी सकाळी दहा वाजता सर्वसाधारण ग्रामसभा बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये दारू अनधिकृत दारू बंदीच्या ठराव घेण्यात आला. या ठरावावरती सौ. अंजली कल्याण साळुंके, अनुमोदक म्हणून सौ कविता अरुण दाखवले यांच्या सह्या आहेत.
यावेळी महिलांनी बोलताना सांगितले की या अवैद्य दारूमुळे शाळकरी मुले ही दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन गिडेगाव शिवारामध्ये होताना दिसत तसेच अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन कोणताही काम धंदा न करता आपल्या कुटुंबामध्ये वादविवादाची संख्या वाढताना या वैद्य दारूमुळे गिडेगाव मध्ये वाढताना दिसत आहे तरीही सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष घालून पूर्ण गावातील दारू बंद करावी अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे सरकारला केली आहे.

यावेळी अंजली साळुंके ,कविता साळुंके,कविता साळुंके , कडुबाई कर्डिले, शीला साळुंके ,नंदाबाई कर्डिले, मीना कदम, सिंधुबाई कदम, शालिनीबाई पाथरकर, मनीषा साळुंके ,शांताबाई बोरुडे ,उज्वला साळुंके,हर्षदा साळुंके, सुशिलाबाई साळुंके,सविता बोरुडे, सविता माळी, निर्मला गायकवाड ,अनिता माळी, सुशीला गायकवाड, जनाबाई ठोकळ राणी चव्हाण ,कविता ठोकळ ,शितल चव्हाण, लता राठोड, शोभा चव्हाण ,मीरा चव्हाण, पारूबाई चव्हाण ,ताराबाई चव्हाण , सोनाली गायकवाड, सुनिता ताकवले ,मीना साळुंके ,प्रयागाबाई साळुंके ,रंजना साळुंके ,रोहिणी साळुंके, छायाबाई गायकवाड ,शांताबाई कर्डिले ,सविता साळुंके ,संजीवनी भूमकर, गिडेगाव गावातील आदी महिलांच्या या निवेदनावरती सह्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.