द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयडॉल ऑफ महाराष्ट्राचा 2025 चा पुरस्कार सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन शिवरकर उद्यान शेजारी वानवडी पुणे येथे पार पडत असून राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक ,अध्यात्मिक , कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येत आहे.
यावर्षीचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2025 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र पत्रकार इन्नुस शरीफ पठाण यांना जाहीर झाला आहे.

त्यांच्या कामाची द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेतली असून येत्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी त्यांना गौरवण्यात येणार आहे .
समाजात उत्कृष्ट निवेदन व उत्कृष्ट पत्रकारिता करत असल्यामुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अगोदर दक्ष पोलीस सामाजिक संस्था आहिल्यानगर यांचाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर प्रेस ,संपादक, पत्रकार संघाचे नेवासा तालुका अध्यक्षपद भूषवत आहेत . या पुरस्कारामुळे नेवासा तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे .तर बालाजी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.