अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाची पीक नुकसान भरपाई योजना आहे. यामध्ये पर्जन्यमान परिमाणानुसार यंदा नियमांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. अशा परिस्थितीत ‘पंचनाम्याचा बडगा’ शेतकऱ्यांवर का चालवायचा?
आज सर्व शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, आधार कार्ड, आणि इतर सर्व कागदपत्रे शासनाकडे उपलब्ध आहेत, आणि ती माहिती आधीच डिजिटल स्वरूपात आधार कार्डाशी लिंक झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाकडे पाठपुरावा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये.
अतिवृष्टीमुळे उभ्या शेतीमालाचे, सध्या पेरणी केलेल्या किंवा टोपण केलेल्या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे बियाणे मातीत भिजून उबट होऊन कोम सडून जात आहेत. परिणामी, शेतीतील सर्व उभ्या पिकांचे उत्पादन शक्य नाही.

सध्या पंचनाम्याची मोहीम राबवण्यात येत असली, तरी या परिस्थितीत पंचनामा करण्याचा बडगा का?
अशा परिस्थितीत सातबारा उताऱ्याच्या आधारे कोणतेही निकष न लावता, सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई शासनाने त्यांच्या बँक खात्यांमध्ये त्वरित वर्ग करणे आवश्यक आहे.
त्यासाठी, नेवासा तहसील कार्यालयात सर्व शेतकरी संघटना आणि प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचे ठराव दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.