लंघे

आज दिनांक 15/09/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्ञानेश्वरी लोकसंचलित साधन केंद्र नेवासा येथे 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न…..

या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्यासपिठावर अध्यक्ष म्हणुन श्रीमती आरती नायडू , नेवासाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी सौ. रत्नमाला लंघे,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. उमेश कहाते विभागीय उपजिवीका सल्लागार श्री नवनाथ नाईक, श्री. मिलिंद बोर्डे, माविम अहिल्यानगर लेखाधिकारी माविमचे एम.आय.एस सल्ललागार योगेश कदम,माविम चे उपजीविका सल्लागार दीपक माने ,ज्ञानेश्वरी लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक मयूर कुलकर्णी, लेखापाल अभिजित गर्जे, उपजीविका सल्लागार नरेंद्र महापुरे, आय.सी‌.आय.सी.आय बँकेचे खांदे साहेब, सागर साहेब, cmrc कार्यालयच्या सर्व सहयोगिनी, crp इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत होते.

लंघे

यावेळी ज्ञानेश्वरी लोकसंचालीत साधन केंद्राच्या २८ गावातील महिला मोठया संख्येने या वार्षिक सभेला उपस्थीत होत्या. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी केले तसेच नवनाथ नाईक यांनी शासनाच्या विविध १० विभागांच्या योजनांची माहिती दीली .

यावेळी सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील बोलताना म्हणाल्या की तुम्ही सर्व महिला आदरणीय भाऊंच्या लाडक्या बहिणी आहात त्यामुळे मला कायम तुमच्या मदतीस तत्पर राहावे लागते आणि भाऊंचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना कायम उपलब्ध राहील असा शब्द देते आपल्या तालुक्यातील कोणत्याही भाऊंच्या लाडक्या बहिणींना कधीही गरज लागू द्या मी त्याच्या सेवेस कायम तत्पर असेल असा विश्वास सौ रत्नमाला लंघे यांनी व्यक्त केला.

लंघे

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि सरकारच्या सुरू असलेल्या सर्व सरकारी योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा सदर योजना मिळत असताना काही अडचण येत येत असतील तर थेट माझ्याशी संपर्क करावा मी तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना व्यक्त केला.

या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आर्थिक विषयक माहिती आणि अहवाल वाचन केंद्राचे व्यवस्थापक मयूर कुलकर्णी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री मयूर कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व cmrc कर्मचारी यांनी परीश्रम घेऊन ही सभा यशस्वी केली.

लंघे
लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!