नेवासा – तालुक्यातील प्रवाशांसाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेवासा बस डेपो साठी आलेल्या अजून नवीन पाच लाल परी बस गाड्या उपलब्ध करून दिल्याआहे त्या बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्तेआज उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी नेवासा आगर कर्मचारी स्टॉप च्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे यांचा सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी नेवासा बसडेपोचे सर्व व्यवस्थापक कर्मचारी व तहसीलदार संजय बिरादार,भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, जिल्हा सचिव अशोक टेकने,युवा मोर्चा प्रदेश निरंजन डहाळे, शहराध्यक्ष मनोज पारखे, शंकरराव लोखंडे युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाजी लष्करे भाऊसाहेब वाघ, अंकुश काळे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, बापूसाहेब दारकुंडे, भाजप जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आदिनाथ पटारे, राजेश कडू , अजित सिंग नरुला, मनोज डहाळे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अमृताताई नळकांडे, राजेंद्र मुथा त्याप्रसंगी महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.