नेवासा- महाराष्ट्र शासन अंतर्गत,शिक्षण विभागामार्फत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विविध कार्यशाळेचे विद्यालयात आयोजन करण्यात येते. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री संजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रंगसंगती, मोजमाप, नीटनेटकेपणा सांगत विद्यार्थ्यांसमोर आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व आकाश कंदील तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संयम,कौशल्य, चिकाटी हे गुण विकसित झाले व या उपक्रमामुळे विविध उपक्रमात सहभागी होण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. यापूर्वीही सरांनी प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणपती तयार करणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

आकाश कंदील तयार करणे या कार्यशाळेसाठी अपडाऊन विभागातील नानासाहेब खाटीक ,बाळासाहेब गटकळ व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
आकाश कंदील तयार करणे या उपक्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुमती घाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहल चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगे पाटील, सहसचिव डॉ श्रुती आमले पाटील, सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे,सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक चौहान सर यांचे कौतुक केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

