पिक

“सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावरील शेती दिन उत्साहात साजरा

सोयाबीन पिकाचे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्या कृषि विद्या विभागाचे प्रमुख श्री. नारायण निबे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथील श्री. रमेश शिंदे यांचे वस्तीवर आयोजित शेती दिन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम श्री. रमेश शिंदे, प्रा. रमेश सरोदे, श्री. राजेंद्र गायकवाड आणि कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस.एस. कौशिक यांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने मा. अध्यक्ष आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील , उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, तज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले पाटील आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत , कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांचे मार्फत सोयाबीन समूह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन बेल पिंपळगाव व घोगरगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे खरीप हंगाम २०२५ मध्ये करण्यात आलेले आहे.

पिक

तसेच डॉ.श्यामसुंदर कौशिक बोलताना म्हणाले की यामध्ये फुले दुर्वा या वाणाचे प्रात्यक्षिक सदर गावात ७५ प्रगतशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले आहे. सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने हे प्रात्यक्षिक घेतले असून जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाण सोबतच रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान , माती परीक्षणानुसार योग्य अन्न द्रव्यांचा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच काढणी पश्च्यात तंत्रज्ञान या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा कृषि विज्ञान केंद्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असे डॉ. शामसुंदर कौशिक यांना बोलताना सांगितले.

याचाच एक भाग म्हणून आज येथे “सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले. शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती प्रगतशील शेतकरी रोहित शिंदे व किरण शिंदे यांनी दिली. सदर प्रात्यक्षिकात त्यांनी जिवाणू खताची बिजप्रक्रीया, सल्फर चा वापर, पिवळे आणि निळे चिकट सापळे, कामगंध सापळे, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.

पिक

कृषि विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ श्री. नारायण निबे यांनी शेती दिनाचे महत्व आणि शेती दिन का घ्यायचा तसेच एकात्मिक पद्धतीने सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे करावे या विषयी उपस्थित शेतकरी मार्गदर्शन केले यांना मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख, डॉ. एस.एस. कौशिक यांनी सोयाबीन पिकात सध्य परिस्थितीत करावयाच्या उपाय योजना, बियाणासाठी सोयाबीन साठवण तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली. तसेच सद्य परिस्थितीत तूर पिकाचे व्यवस्थापन कसे करावे व कांदा व्यवस्थापन तंत्र या विषयी सांगितले. श्री. प्रकाश बहिरट यांनी माती परीक्षण आणि त्या नुसार एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी रमेश शिंदे, विलास सरोदे, किरण शिंदे, विश्वनाथ शिंदे, गोविंद पऱ्हाड , दिगंबर बोर्डे, आबासाहेब शिंदे, बाळासाहेब घोगरे, दिगंबर आव्हाड, सय्यद आमीन रमेश सरोदे राजेंद्र गायकवाड सचिन सरोदे मंगेश सरोदे सचिन शिंदे रजनीकांत सरोदे अनिल कोथळे बाळासाहेब सुरसे,मोरे ताई तसेच गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नारायण निबे तर प्रास्ताविक रमेश सरोदे यांनी आभार मानले.

पिक
पिक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पिक
पिक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!