दांडिया

नेवासा : नेवासा शहरात हिरकणी महिला क्लबच्या वतीने आज भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव मोहीनीराज मंगल कार्यालय येथे पार पडणार असून साधारण २५० ते ३०० महिला या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती हिरकणी ग्रुपच्या संस्थापक सौ. अर्चना फिरोदिया आणि सौ. नंदीनी सोनवणे यांनी दिली.

दांडिया

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून लोकप्रिय अँकर आरजे प्रसन्ना उपस्थित राहणार आहेत. तसेच या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बेस्ट ग्रुप, बेस्ट ड्रेस, बेस्ट सोलो, बेस्ट ड्युएट यांसह अनेक श्रेणींमध्ये आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय सहभागींसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे.

महिला सहभाग, मनोरंजन आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम घडवून आणणारा हा दांडिया महोत्सव नेवासा परिसरातील महिलांसाठी आनंदाचा पर्वणी ठरणार आहे.

दांडिया

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दांडिया
दांडिया

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दांडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!