नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील : तालुक्यातील सुरेगाव गंगा रोड,नेवासा बुद्रुक येथील श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र “ब वर्ग दर्जा” प्रदान करण्यात आला आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवारी सायंकाळी पाच वाजता राज्य शासनाचे ब वर्ग दर्जाचे अधिकृत पत्र सद्गुरू आश्रमास प्राप्त झाल्याची माहिती आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य बाबा ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी दिली.बाबा पुढे म्हणाले की, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम स्थापनेपासून दिवसेंदिवस भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेता आश्रमातील आहे त्या व्यवस्थेत आश्रमात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. त्यामुळे आश्रमात भाविकांच्या हितासाठी काही सुखसुविधा निर्माण करण्याची नितांत गरज होती.

त्या दृष्टीने सद्गुरू आश्रमाच्या वतीने वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सद्गुरू कृपेनें आज खऱ्या अर्थाने त्याला यश मिळाल्याची भावना बाबांनी व्यक्त केली.हा क्षण आम्हा प्रत्येक वारकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याची भावना बाबांनी व्यक्त केली.या कामामध्ये विशेष लक्ष घालून, वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन करून सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील(जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर) व मा. सौ. शालिनीताई विखे पाटील (मा.अध्यक्ष, जि.प.अहिल्यानगर) यांचे सर्व वारकरी भाविकांच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहे.

तसेच सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास “ब वर्ग दर्जा” प्राप्त करून दिल्याबद्दल गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र),मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब ( उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र ), मा.ना. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र), मा. ना.राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री, अहिल्यानगर) मा.ना.सतीष चव्हाण साहेब (प्रदेशाध्यक्ष, भाजपा) मा. सौ.शालिनीताई विखे पाटील (मा.अध्यक्ष,जि.प.अहिल्यानगर) यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत… राम कृष्ण हरी ll

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

