बॉम्बे उच्च न्यायालयाने शनैश्वर देवस्थान ट्रस्ट (शिंगणापूर) संदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण आदेश देत “स्थिती जशी आहे तशीच कायम ठेवावी” (status quo) असा निर्देश दिला आहे. या आदेशामुळे मंदिर परिसरातील सध्याचा व्यवस्थापन कारभार जसाच्या तसा राहणार असून, कोणत्याही नवीन शासकीय हस्तक्षेपावर तात्पुरती मर्यादा आणली गेली आहे.
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे निवडून आलेले विश्वस्त सरकारच्या अलीकडील कारवाईविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी असा आरोप केला की, “शासनाने २०१८ मध्ये मंजूर केलेल्या अधिनियमाची अंमलबजावणी नियमावलीशिवाय आणि आवश्यक व्यवस्थापन समिती स्थापनेशिवाय केली,” जे बेकायदेशीर आहे.

राज्य सरकारतर्फे उपस्थित सरकारी वकिलांनी मान्य केले की व्यवस्थापन समिती अद्याप स्थापन झालेली नाही, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून ताबा घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भातील पंचनामा व बैठकीची कागदपत्रे सादर केली.
न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या या मुद्द्यावरून स्पष्ट केले की, प्रशासकाने प्रत्यक्ष ताबा घेतला की नाही, हे प्रत्यक्ष तपासणीअंती ठरवावे लागेल. तोपर्यंत कोणताही बदल न करता स्थिती कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्व पक्षांनी दक्ष राहण्याचे निर्देशही देण्यात आले.
राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करावयाचे आहे. पुढील सुनावणी १० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.