ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
धनधान्य योजना

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे पीएम धनधान्य योजन आणि कडधान्य आत्मनिर्भरता मिशन कार्यक्रमाचे आयोजन

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पीएम धनधान्य योजना आणि कडधान्य आत्मनिर्भरता मिशन शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. सदर कार्यक्रम आयोजन करणेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंचावर संस्थेचे विश्वस्त श्री. विष्णू जगदाळे, तालुका कृषि अधिकारी श्री. अंकुश जोगदंड आणि श्री. माणिक लाखे प्रभारी प्रमुख कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या उपस्थित होते.

धनधान्य योजना

दिनांक ११ ऑक्टोबर या ऐतिहासिक दिवशी म्हणजे भारतरत्न जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख लोकशाहीचे जनक आणि शेतकरी हित जपणारे असल्यामुळे त्यांच्या जयंती निमित्त पीएम धनधान्य योजना आणि कडधान्य आत्मनिर्भरता मिशन शुभारंभ कार्यक्रम मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पुसा नवी दिल्ली येथे पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि बळीराजाच्या कल्याणासाठी दोन महत्वपूर्ण नवीन योजना भारताच्या करोडो शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्याचे कार्य करू शकणाऱ्या या योजनेत भारत सरकार ३५ हजार करोड पेक्षा जास्त रक्कम खर्च करणार असल्याचे मा. पंतप्रधान यांनी नमूद केले. या दोन योजेनेसाठी त्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

२१ व्या शतकातील भारताच्या गतिमान विकासासाठी व भरभरटीसाठी कृषि व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक होते त्यासाठी भारत सरकार बियाणे पासून काढणी पाश्च्यात ते विक्री पर्यंतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे मागील ११ वर्षात अन्नधान्य निर्यात दुपटीने वाढली आहे. जागतिक स्तरावर दुध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर तर मत्य्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर, मध उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. जमीन आरोग्य पत्रिका, पिक विमा, सूक्ष्म सिंचन पी.एम. किसान सन्मान निधी इ योजना शेतकरी हितासाठी प्रभावीपणे सुरु आहे.

धनधान्य योजना

धनधान्य योजना देशातील निवडक १०० जिल्ह्यात राबविनार असून देशात कृषि सखी, पशु पालन , नमो ड्रोन दीदी प्रशिक्षित करण्यात आल्या आहेत . नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत १७ हजार पेक्षा जास्त कृषि सखीना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सुधारित जी.एस.टी. दरामुळे शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे, यंत्रे इ. शेती साहित्य खरेदी मध्ये बचत होत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषि विज्ञान केंद्राचे प्रभारी प्रमुख माणिक लाखे यांनी केले तर श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी कांदा उत्पादन तंत्रज्ञान, नारायण निबे यांनी कडधान्य उत्पादन तंत्रज्ञान तसेच गळीतधान्य पिके तर डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी पशुपालकांना लसीकरण विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रकाश बहिरट यांनी नैसर्गिक कृषि निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तालुका कृषी अधिकारी शेवगाव अंकुश जोगदंड यांनी कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी व कार्यक्षेत्रामधील चारशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी तर आभार श्री इंजि. राहुल पाटील यांनी मानले.

धनधान्य योजना
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धनधान्य योजना
धनधान्य योजना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धनधान्य योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *