तेलकूडगाव | समीर शेख – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहील्यानगर,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय संगमनेर स्पोर्ट्स, कराटे असोसिएशन अहिल्यानगर व श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमनेर आयोजत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नुकत्याच श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमनेर येथे क्रीड़ा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.सदर स्पर्धेचे संचालन लक्ष्मण तनपुरे व मंडलिक सर यांनी केले होते.
या स्पधेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाण संचलित तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत यश मिळविले.

यामध्ये १४ वर्ष वयोगटात अभिषेक वजीर-सिल्वर मेडल,मोहित राठोड़-ब्रांझ मेडल,१७ वर्ष वयोगटात आदित्य वजीर- गोल्ड मेडल,करण खोमणे- ब्रांझ मेडल, आर्यन भापकर -सेकंड ब्रांझ मेडल,साई गुंजाळ- सेकंड ब्रांझ मेडल, चैतन्य आव्हाड -सिल्वर मेडल,१९ वर्ष वयोगटात सिद्धार्थ कोलते-सिल्वर मेडल तसेच रियान शेख याने गोल्ड मेडल पटकावले.१७ वर्ष वयोगटात आदित्य वजीर व १९ वर्ष वयोगटात रियान शेख याची विभागीय स्तरावर निवड झाली.सदर यशस्वी खेळाडूंना मास्टर आनिल मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाणपाटील,सचिव मनिष घाडगेपाटील, सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील तसेच विश्वस्त चेतन चव्हाणपाटील, विश्वस्त डाॅ.गौरव आमलेपाटील व विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी अभिनंदन केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

