नेवासा फाटा – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, नेवासा फाटा येथील श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपुर येथे दिनांक 14,15 व 16 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा होणार असल्याचे श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे यांनी सांगितले.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व अहिल्यानगर कुस्तीगीर संघ तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपुर यांचे संयुक्त विद्यमाने 19 वर्षे मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 14, 15 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपन्न होत असून या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आद.डॉ. पंकज आशिया साहेब, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप, नेवासा मतदार संघाचे आ. विठ्ठलराव लंघेपाटील उपस्थित राहणारा असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमतीताई घाडगेपाटील व महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालयाचे उपसंचालक युवराज नाईक साहेब, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस,

हिंदकेसरी, पै. योगेश भाऊ दोडके, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष ॲड.स्नेहल चव्हाणपाटील, अहिल्यानगर कुस्ती संघाचे सचिव प्रा. डॉ.संतोष भुजबळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संपन्न होणार असून तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सोपान काळे यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.