अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा–औरंगाबाद मार्गाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आज मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा व संवाद साधला.यावेळी संगमनेर चे आमदार अमोल खताळ व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन दिनकर हे उपस्थित होते . रस्त्यावरील खड्डे, वाहतूक अडचणी आणि नागरिकांच्या गैरसोयींचा विषय त्यांनी ठळकपणे मांडत त्वरित दुरुस्तीचे निवेदन सादर केले.

या चर्चेनंतर बांधकाम मंत्र्यांनी तातडीने आदेश जारी करत रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. लवकरच नगर–औरंगाबाद हायवेवरील दुरुस्तीची कामे सुरू होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आमदार लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि लोकहितासाठी घेतलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.