नेवासा तालुक्यातील अनेक ठिकाणी दूध संकलन केंद्रावर वजन काटे चेक होत नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे.
त्याचप्रमाणे दुधाची क्वालिटी चेक करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन जाणीवपूर्वक अनेक पॉईंट मागे ठेवण्यात येते व परिणामतः कितीही क्वालिटीचे दूध दिले तरी शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही.
मात्र प्रशासनाला संकलकांकडून मलिदा मिळत असल्याकारणाने संबंधित गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते.

अगोदरच मेटाकोटीस आलेल्या शेतकऱ्याला केवळ पशुधनाचा आधार आहे त्यात लंपी या आजाराने शेतकऱ्यांनी अनेक पशुधन गमावण्याची वेळ आलेली आहे.
काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्यात या दूध संकलकांकडून होणारी लूट !
शेतकरी या सर्व गोष्टींमुळे अक्षरशा हैराण झालेला आहे .
आजपर्यंत कुठल्याही भागात दूध संकलन केंद्रावर तपासणी झालेली दिसून येत नाही याचे कारण काय?
संबंधित लुटीची जिल्हाधिकारी दखल घेणार का?

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

