गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील एका हाॅल मध्ये येथे सन १९९८ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आपले बालपणीचे सवंगडी भेटल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या कार्यक्रमाचे निमित्ताने पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येक जण आता आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. अनेक जण नोकरी निमित्त बाहेर गावी असतात. त्यामुळे तो आपल्या गावाकडील मित्रांना विसरतो परंतु या मेळाव्यात सर्व जण एकत्र आल्यावर पुन्हा त्या आठवणी जाग्या होतात. आम्ही तुम्हाला शिक्षा केली ती तुम्ही कुठेतरी शिक्षण घेऊन स्वबळावर उभे रहावे हा त्या मागे आमचा हेतू होता.

प्रत्येकाने या कार्यक्रमाचे माध्यमातून गोरगरिबांना एक मदतीचा हात द्यायला हवा तसेच आता आपण आपल्या उतार वयाकडे जात आहोत या सर्वांबरोबर अध्यात्मिक क्षेत्रात देखील उतरायला हवे. असे विद्यालयाचे माजी प्राचार्य आण्णासाहेब दरंदले यांनी सांगितले. या वेळी गणेश मामा क्लासवाले,प्राचार्य आण्णासाहेब दरंदले,शिक्षक व्ही एम दरंदले ,बि.एस भुसारी,खोसे सर,शेख सर,महामिने सर,बिडे मॅडम, डौले मॅडम सह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत ससाणे, राहुल दरंदले,सोपान लोणारी, यांनी केले तर सुहास भळगट, प्रविण बंग यांनी उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे शेवटी सर्वांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

