नेवासा – आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय व ऊस्थळ दुमाला या ठिकाणी इयत्ता दहावी 2005 यावर्षीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वी पार पडला.
या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक तत्कालीन विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांचा पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले नंतर त्यांना फेटे घालून त्यांचे मिरवणूक काढून व्यासपीठावर आणण्यात आले त्यानंतर गुरुजनांचे गुरूपादुका पूजन विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तत्कालीन पर्यवेक्षक जमदाडे सर तत्कालीन उपमुख्याध्यापक ससे सर,कलाशिक्षक कोलतें सर, साठे मॅडम, डवले मॅडम,शिंदे सर, दरंदले सर, शेख सर आणि इतर शिक्षक उपस्थित होते.

कोलते सर यांनी आपल्या मनोगतांमध्ये त्याकाळचे विद्यार्थी संस्कार आणि कौटुंबिक लागलेला वारसा व आत्ताचे पिढी यामध्ये कसा बदल होत गेला व दिवसेंदिवस मोबाईल आणि आधुनिक जीवनशैली मुळे धर्म संस्कृती कशा पद्धतीने लोप पावत चालली या गोष्टीवर प्रकाश टाकला.
सोबतच जमदाडे सर यांनी आजीच्या चिऊ काऊच्या गोष्टी आणि आजकाल आई मुलांना जेवताना वापरायला देणारा मोबाईल यामुळे काय तफावत होत आहे या गोष्टीवर भाष्य केले.
कार्यक्रमादरम्यान स्वागत समारंभ गुरुपादुका पूजन शिक्षकांचे मनोगत विद्यार्थ्यांचा परिचय त्याचप्रमाणे विविध खेळ गप्पा गोष्टी गाणी या पद्धतीने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरगच्च सहसा कार्यक्रम आयोजित केला होता दुपारी सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद देखील लुटला या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी संपन्न होण्यासाठी इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता दळे व बाळासाहेब पिसाळ, यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद गायकवाड सर यांनी केले, आभार प्रदर्शन नंदकिशोर लोखंडे यांनी करून कार्यक्रम चीं सांगता झाली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

